Published Oct 28, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
देशभरातचं नाही तर संपूर्ण जगांत iPhone ची मोठी क्रेझ आहे. iPhone लाँच होताच तो खरेदी करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी असते.
iPhone चे प्रत्येक मॉडेल लोकांमध्ये एक वेगळी क्रेझ घेऊन येते. प्रत्येक आयफोनची खासियात त्याचा कमेरा असतो.
आयफोनमधून काढल्या जाणाऱ्या फोटोंची क्वालिटी बेस्ट असते असं प्रत्येकाला वाटतं.
सहसा iPhone च्या प्रो मॉडेल्समध्ये 3 कॅमेरे आणि बेस व्हेरिअंटमध्ये 2 कॅमेरे दिले जातात.
पण iPhone चे स्पेसिफिकेशन पाहिले तर iPhone च्या पहिल्या 2 केमऱ्यामधूनच फोटो काढले जातात.
तुम्हाला माहीत आहे का iPhone चा तिसरा कॅमेरा कशासाठी दिला जातो?
iPhone च्या तिसऱ्या कॅमेऱ्यामध्ये टेलिफोटो लेंस दिली जाते. जी झूम वाढवण्यासाठी मदत करते.
टेलिफोटो लेंस महागड्या आणि प्लॅगशिप फोनमध्ये दिली जाते.
टेलिफोटो लेंसच्या मदतीने तुम्ही मागील बॅकग्राऊंड ब्लर करू शकता आणि मेन ऑब्जेक्टला हायलाइट करू शकता.
टेलिफोटो लेंसच्या मदतीने तुम्ही DSLR सारखे फोटो क्लिक करू शकता.
iPhone च्या तिसऱ्या कॅमेऱ्यामध्ये हाय रिझोल्यूशन आणि उत्तम लो- लाईट परफॉर्मंस मिळतो.