Published Sept 26, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
टॉमेटोला फळ म्हणावे की भाजी?
सलाड, भाजी स्वरूपात खाल्ला जाणारा टॉमेटो हे नक्की फळ आणि की भाजी? माहीत आहे का तुम्हाला?
टॉमेटो सलाड स्वरूपात अधिक खाल्ला जातो, पण हे नक्की फळ आणि की भाजी याबाबत अनेकांना माहितीच नाहीये
हा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल आणि तुम्ही टॉमेटो ही भाजी म्हणत असाल तर अजिबात नाही. टॉमेटो हे फळ आहे
.
विज्ञानाच्या दृष्टीने झाडावर आलेल्या फुलाचे फळात रूपांतर होते आणि टॉमेटोही अशाच पद्धतीने तयार होतो
.
या कारणामुळे टॉमेटो हे फळ असल्याचे सांगण्यात येते, मात्र ज्यांना ही भाजी वाटत होती त्यांची आता नक्कीच फजिती झाली असेल
झाडाचे मूळ, पाने याचा भाजीमध्ये समावेश होतो. त्यामुळे बटाटा, मुळा, गाजर यांचा समावेश भाजीत होतो
टॉमेटोशिवाय वांगं, काकडी, मटार आणि भेंडीदेखील भाजी नसून फळं आहेत, वाटलं ना आश्चर्य?
माहिती ही तपासून देण्यात आली आहे, मात्र आम्ही कोणताही दावा करत नाही