Published Sept 24, 2024
By Shweta Chavan
Pic Credit - iStock
छत्रपती शिवाजी महाराज द्यायचे 'ही' कठोर शिक्षा
शिवाजी महाराज त्यांच्या स्त्री दाक्षिण्याविषयी प्रसिद्धच आहे.
स्त्रियांचा अवमान शिवाजी महाराजांनी कुठल्याही प्रकारे खपवून घेतला नाही, असे स्पष्ट केले होते.
महाराजांनी स्त्रियांना दिलेल्या मानाचे अनेक प्रसंग प्रसिद्ध आहेत.
.
पुण्यापासून ३० किलोमीटर अंतरावर पुणे-बेंगळुरू महामार्गावरील खेडशिवापूरपासून पाच किलोमीटर अंतरावर रांझे गाव आहे.
.
रांझे गावचा पाटील, भिकाजी गुजर याला दिलेली शिक्षा तर जगजाहीर आहे. ही शिक्षा चौरंगा म्हणून ओळखली जाते.
भिकाजी पाटील याने केलेल्या लैंगिकच्या गुन्ह्यासाठी महाराजांनी त्याचे हात पाय कलम करण्याची शिक्षा दिली होती.
या शिक्षेला ‘चौरंगा करणे’ असे म्हणतात. या शिक्षेनंतर अशा स्वरूपाचे कृत्य करण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही.
चुकीच्या गोष्टींसाठी संस्कृतीचे दाखले देणाऱ्यांनी आपल्या संस्कृतीत कठोर दंडही अमलात आणल्या जात होत्या.