Royal Enfield ची सर्वात मोठी Himalayan! 750cc इंजिनसह येणार, पाहा 10 खास फीचर्स

Automobile

09 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

Royal Enfield Himalayan 750 अधिकृतपणे सादर झाली आहे. मोठे इंजिन, अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि लांबच्या प्रवासासाठी खास बदल यामुळे ही बाईक चर्चेत आहे.

दमदार एंट्री!

Picture Credit:royalenfield

या बाईकमध्ये 743cc, एअर आणि ऑइल कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिन मिळते. हे इंजिन 55hp पॉवर आणि 63Nm टॉर्क निर्माण करते.

743cc चे दमदार इंजिन

Picture Credit:royalenfield

Himalayan 750 चे भारतातील कर्ब वजन 224 किलो आहे. त्यामुळे ही बाईक वजनदार अ‍ॅडव्हेंचर टूररच्या श्रेणीत येते.

किती आहे वजन?

Picture Credit:royalenfield

यात Himalayan 450 सारखा दिसणारा TFT डिस्प्ले आहे. मात्र, 750 मध्ये इन-बिल्ट SIM, Wi-Fi आणि Bluetooth कनेक्टिव्हिटी मिळते.

TFT डिस्प्लेमध्ये मोठे अपग्रेड

Picture Credit:royalenfield

या बाईकमध्ये 6-axis IMU, Cornering ABS, Lean-sensitive Traction Control, Cruise Control आणि TPMS मिळते. पाच राइड मोड्सही देण्यात आले आहेत.

टेक्नॉलॉजीच्या बाबतीत पुढे

Picture Credit:royalenfield

Himalayan 750 तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. बेस व्हेरिएंटमध्ये अलॉय व्हील्स, तर पुढील व्हेरिएंटमध्ये Cross-spoke व्हील्स मिळतात. टॉप व्हेरिएंटमध्ये टूरिंग अ‍ॅक्सेसरीजही आहेत.

तीन व्हेरिएंट्सचा पर्याय

Picture Credit:royalenfield

पुढील बाजूला दोन 280mm डिस्क ब्रेक, तर मागे 255mm डिस्क ब्रेक मिळतात. 43mm Fully Adjustable USD Fork आणि Adjustable Rear Monoshock दिले आहे.

ब्रेकिंग आणि सस्पेन्शन

Picture Credit:royalenfield

या बाईकची सीट हाइट 815mm असून ग्राउंड क्लिअरन्स 205mm आहे. लांब प्रवासासाठी 17.8 लिटर क्षमतेची फ्यूल टँक देण्यात आली आहे.

सीट हाइट आणि फ्यूल टँक

Picture Credit:royalenfield

Himalayan 750 च्या भारतातील लॉन्चची अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. नोव्हेंबर 27 ते 29 दरम्यान गोव्यात होणाऱ्या Motoverse 2026 मध्ये ती सादर होण्याची अपेक्षा आहे.

भारतात कधी येणार?

Picture Credit:royalenfield