₹3.97 लाखांची Montra Electric Super Auto! रेंजपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

Automobile

17 Nov 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

दोन व्हेरिएंट्स

Montra Super Auto मध्ये ePL 2.0 R आणि ePL 2.0 असे दोन मॉडेल पर्याय आहेत. दोन्हीमध्ये 10.6kWh बॅटरी आणि 160 किमीपेक्षा जास्त रेंजचा दावा करण्यात आला आहे.

Picture Credit: montraelectric

एका चार्जमध्ये 160 किमी प्रवास!

कंपनीच्या माहितीनुसार, सामान्य प्रवासी आणि शहरी वाहतुकीच्या परिस्थितीत ही रिक्षा सुमारे 160±5 किमी अंतर धावू शकते. प्रमाणित रेंज 239 किमी आहे.

Picture Credit: montraelectric

60Nm टॉर्क अन् 55kmph वेग

या इलेक्ट्रिक रिक्षामध्ये 60Nm पीक टॉर्क मिळतो. तिचा कमाल वेग 55kmph आहे. शहरातील प्रवासी वाहतुकीसाठी ही कामगिरी उपयुक्त ठरू शकते.

Picture Credit: montraelectric

फक्त 4 तासांत पूर्ण चार्ज!

स्टँडर्ड ऑफ-बोर्ड चार्जरच्या मदतीने बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी सुमारे 4 तास लागतात. नियमित वापर करणाऱ्या चालकांसाठी हे वैशिष्ट्य महत्त्वाचे आहे.

Picture Credit: montraelectric

चालकांसाठी आराम

चालकासाठी उंच बॅकरेस्ट, अधिक हेडरूम आणि लेगरूम देण्यात आली आहे. लांब वेळ रिक्षा चालवणाऱ्या चालकांचा आराम लक्षात घेऊन केबिनची रचना केली आहे.

Picture Credit: montraelectric

डिजिटल फीचर्स

रिक्षामध्ये Fully Digital Instrument Cluster मिळतो. तसेच परिस्थितीनुसार ड्रायव्हिंग बदलण्यासाठी Super Drive Modes चा पर्याय देण्यात आला आहे.

Picture Credit: montraelectric

डिझाइन आणि सुरक्षित बांधणी

या रिक्षाला मजबूत मेटल बॉडी आणि टिकाऊ चेसिस मिळते. मोठे विंडशील्ड, LED टेललाइट्स आणि सामान ठेवण्यासाठी उघडता येणारे टेलगेट ही तिची खास वैशिष्ट्ये आहेत.

Picture Credit: montraelectric

प्रति किमी खर्च फक्त 53 पैसे?

कंपनीच्या दाव्यानुसार, या रिक्षाचा रनिंग कॉस्ट प्रति किमी 53 पैसे आहे. कमी देखभाल खर्च आणि 3 प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था यामुळे व्यावसायिक वापरासाठी हा पर्याय महत्त्वाचा ठरू शकतो.

Picture Credit: montraelectric