whatsApp वर तुम्हाला असे वाटते की कोणीतरी तुमचे मेसेज, WhatsApp चॅट्स आणि कॉल्सवर लक्ष ठेवून आहे. हे एप  एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह येते, त्यामुळे असे होऊ शकते का जाणून घ्या. 

तुम्हाला तुमचे  whatsApp मेसेज आधीच वाचलेले सापडल्यास किंवा तुम्हाला असे चॅट मिळाले, जे तुम्ही केलेच नसतील, तर समजून घ्या की तुमच्या अकाउंट दुसरं कोणीतरी चालवतंय

  whatsAppने नुकतेच एक नवे फिचर लाँच केले आहे. हे फिचर आहे मल्टी डिव्हाईस सपोर्ट. एकच whatsApp अकाउंट तुम्ही एकपेक्षा अधिक डिव्हाईसवर वापरले जाऊ शकते.

whatsapp new फिचरमध्ये तुमचं whatsapp तुम्ही दुसऱ्याच्या फोनमध्ये ओपन करू शकता. चॅट्स, कॉल्स अगदी सहज access करू शकता. 

whatsApp च्या या नव्या फिचरमध्ये एक गोष्ट चांगली आहे, ती म्हणजे तुमचं अकाउंट किती डिव्हाइसशी लिंक आहे याची माहिती तुम्हाला मिळू शकते. 

 whatsapp img unsplash 1 यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये WhatsApp उघडावे लागेल. येथे तुम्हाला Linked Devices चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करावे लागेल.

यानंतर तुम्ही ज्या ज्या डिव्हाईसला whatsapp लिंक केलेले आहे ते सर्व तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

या लिस्टमध्ये एखादा unknown डिव्हाईस असेल तर समजावे की कोणीतरी तुमच्यावर नजर ठेवून आहे. हा unkown डिव्हाईस तुम्ही unlink करू शकता. 

अशा प्रकारे तुम्ही तुमचे Whatsapp अकाउंट सुरक्षित ठेवू शकता. तुम्ही ठराविक दिवसांनी लिंक केलेल्या डिव्हाइसची यादी तपासत रहा.