WhatsApp हे लोकप्रिय मेसेजिंग app आहे. Wear OS साठी देखील app लाँच करण्यात आलं आहे.
Wear OS वापरणाऱ्यांना WhatsApp वर चॅटिंगसाठी स्मार्टफोनशी कनेक्ट करण्याची गरज नाही.
नवे WhatsApp चे व्हर्जन wear os 3 वर चालणाऱ्या स्मार्टवॉचवर काम करेल.
लवकरच हे app तुमच्या अँड्रॉईड स्मार्टवॉचवरही दिसेल. मात्र, त्याचे फिचर्स मर्यादित असतील.
WhatsApp च्या Wear OS व्हर्जनवर चॅटिंगचा पर्याय उपलब्ध असेल.
याशिवाय तुम्हाला व्हॉईस मेसेज, इमोजी आणि क्विक रिप्लायचा पर्यायही मिळेल.
wear OS ही स्मार्टवॉचसाठी google ची Android आधारित ऑपरेटिंग system आहे.
Wear OS ची बीटा आवृत्ती आधीच लॉन्च करण्यात आली होती. Google च्या या OS वर फक्त निवडक घड्याळे काम करतात.
Wear OS पर्याय Samsung च्या Galaxy Watch 4 आणि 5 च्या सीरिज, TicWatch Pro 5, Fossil Gen 6 आणि Michael Kors Gen 6 Bradshaw वर उपलब्ध आहे.