व्हॉट्सअप नवीन फिचरवर काम करत आहे. यामध्ये यूजर एका ठराविक वेळेसाठी मेसेजला pin करू शकतील.
व्हॉट्सअॅपचे हे फिचर Advanced मोडमध्येही काम करेल.
WhatsAppच्या या लेटेस्ट फीचरचे अपडेट बीटा 2.23.13.11 व्हर्जनमध्ये देण्यात आले आहे. ते Google Play वर उपलब्ध आहे
नवीन पिनिंग फिचर वापरणे खूप सोपे होईल. यामध्ये, तुम्ही संदर्भासाठी कोणताही मेसेज पिन करू शकता आणि त्याची वेळ सेट करू शकता.
या आगामी फीचरमध्ये यूजर्सना मेसेज pin करण्यासाठी 24 तास, 7 दिवस आणि 30 दिवस असे पर्याय असतील.
यूजर्स मॅन्युअलीही pin मेसेज unpin करू शकतात. ठरलेल्या वेळेपूर्वी कधीही मेसेज unpin करता येईल.
pin मेसेज पाठवण्याचे हे फिचर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
यूजर्स जेव्हा whatsApp ओपन करतील तेव्हा महत्त्वाचे मेसेज सर्वात वर दिसतील.
whatsAppचे हे फीचर सध्या बीटा व्हर्जनमध्ये आहे आणि ते कधी लॉन्च होईल याबद्दल अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.
whatsAppचं स्क्रीन शेअर फिचरही लवकरच यूजर्सना वापरता येणार आहे.