रस्त्यावरील खिळा, स्क्रू किंवा काच टायरमध्ये घुसल्यास छोट्या छिद्रातून हवा हळूहळू बाहेर पडू शकते.
Picture Credit:pinterest
टायरमध्ये हवा भरण्यासाठी असलेल्या व्हॉल्व्हचा कोअर सैल झाला किंवा खराब झाला, तर तिथून हवा लीक होऊ शकते.
Picture Credit:pinterest
रिम वाकला, खराब झाला किंवा त्यावर गंज जमा झाला तर टायरची सीलिंग व्यवस्थित होत नाही. परिणामी हवा बाहेर पडू शकते.
Picture Credit:pinterest
टायरचा बीड म्हणजे रिमला घट्ट पकडून ठेवणारा कडा. हा भाग खराब किंवा व्यवस्थित बसलेला नसल्यास हवा लीक होते.
Picture Credit:pinterest
टायरच्या साइडवॉलवर भेगा, कट किंवा नुकसान झाल्यास हवा बाहेर पडू शकते. अशा प्रकारचे नुकसान दुर्लक्षित करू नका.
Picture Credit:pinterest
व्हॉल्व्हच्या तळाशी असलेले रबर खराब झाले किंवा त्याची फिटिंग सैल झाली तर तिथूनही हवा बाहेर जाऊ शकते.
Picture Credit:pinterest
थंडीमध्ये टायरमधील हवेचा दाब कमी होऊ शकतो. प्रत्येक वेळी हवा कमी होणे म्हणजे पंक्चरच असेल असे नाही.
Picture Credit:pinterest
टायरवर साबणाचे पाणी लावा. ज्या ठिकाणी सतत बुडबुडे तयार होतात, तिथून हवा गळत असल्याची शक्यता असते. गळती आढळल्यास मेकॅनिककडून तपासणी करून घ्या.
Picture Credit:pinterest