भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या या Bikesचा इतिहास तुम्हाला माहित आहे का?

Automobile

10 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

हो! भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच मोटरसायकली भारतात वापरल्या जात होत्या. मात्र त्या आजच्या सारख्या सर्वसामान्यांच्या हातात नव्हत्या.

1947 पूर्वी भारतात Bikes होत्या का?

Picture Credit:pinterest

त्या काळात प्रामुख्याने ब्रिटिश कंपन्यांच्या मोटरसायकली भारतात दिसत. Royal Enfield, BSA, Triumph आणि Norton यांसारखी नावे प्रसिद्ध होती.

ब्रिटिश काळातील Bikes

Picture Credit:pinterest

Royal Enfieldच्या मोटरसायकलींचा वापर विशेषतः लष्करी आणि सरकारी कामांसाठी केला जात असे. मात्र भारतात Bulletचा मोठ्या प्रमाणावर सरकारी वापर स्वातंत्र्यानंतर वाढला.

Royal Enfield

Picture Credit:pinterest

BSAच्या मोटरसायकली ब्रिटिश सैन्यात मोठ्या प्रमाणावर वापरल्या गेल्या. मजबूत बांधणीमुळे त्या लष्करी कामांसाठी उपयुक्त ठरत.

BSA Bikes

Picture Credit:pinterest

Triumph आणि Norton यांसारख्या ब्रिटिश मोटरसायकलीही त्या काळात उपलब्ध होत्या. त्यांचा वापर प्रामुख्याने सैन्य, पोलिस आणि मोटरसायकलप्रेमी करत.

Triumph आणि Norton

Picture Credit:pinterest

त्या काळात मोटरसायकलींचा वापर प्रामुख्याने British Army Officers, Military Dispatch Riders, Police आणि सरकारी अधिकारी करत होते.

कोण वापरत होते?

Picture Credit:pinterest

मोटरसायकलींचा वापर संदेश पोहोचवणे, गस्त घालणे आणि लष्करी/सरकारी कामे करण्यासाठी केला जात असे. त्यामुळे मजबूत आणि विश्वासार्ह बाइकला प्राधान्य होते.

Bikesचा उपयोग कशासाठी?

Picture Credit:pinterest

मोटरसायकल त्या काळात महाग आणि तुलनेने दुर्मिळ होती. त्यामुळे त्या सामान्य कुटुंबांपेक्षा सरकारी यंत्रणा, सैन्य आणि श्रीमंत मोटारप्रेमी यांच्यात जास्त दिसत.

सामान्य लोकांकडे का नव्हत्या?

Picture Credit:pinterest

स्वातंत्र्यानंतर भारतात मोटरसायकलींचा वापर हळूहळू वाढला. Royal Enfield Bulletला भारतीय सैन्य आणि पोलिसांकडून मिळालेल्या मोठ्या ऑर्डर्समुळे तिची भारतातील ओळख आणखी मजबूत झाली.

स्वातंत्र्यानंतर काय बदलले?

Picture Credit:pinterest