हिंदू धर्मामध्ये तुळशीचे रोप पवित्र मानले जाते. तुळशीमध्ये देवी लक्ष्मी असते, अशी मान्यता आहे. तुळस सकारात्मकतेचे प्रतीक आहे.
रोज सकाळी संध्याकाळ तुळशीजवळ दिवा लावणे, पाणी अर्पण करणे, प्रार्थना करणे. मात्र चुकूनही तुळशीजवळ ही रोपे ठेवू नये. कोणती आहेत ती रोपे जाणून घ्या
निवडुंग दिसायला खूप सुंदर असते. वास्तुशास्त्रानुसार याचे काटे अशुभ आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे हे रोप कधीही तुळशीसमोर लावू नये
मनी प्लांट देखील खूप शुभ मानले जाते. मात्र वास्तूशास्त्रानुसार हे तुळशीसमोर लावणे शुभ मानले जात नाही.
अपराजिता वनस्पती देवीच्या पूजेसाठी खूप शुभ आणि उपयुक्त मानली जाते. मात्र हे रोप तुळशीजवळ लावू नये. असे केल्याने दोन्ही वाढीवर परिणाम होतो
धतुरा हे महादेवांना अर्पण केले जाते. मात्र याला कधीही तुळशीजवळ लावू नये. तुळशीजवळ हे लावल्याने खूप मोठे दोष उद्भवू शकतात.
लिंबूचे रोप औषधीय गुणधर्मांनी उपयुक्त असते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाजवळ लिंबूचे रोप लावू नये. यामुळे घराची समृद्धी थांबते.