हे असे एक फळ आहे जे कोणत्याही ऋतूत उपलब्ध होते.
केळ्याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होते.
मात्र योग्य वेळेस याचे सेवन केल्याने अनेक फायदे होऊ शकतात.
या फळामध्ये कार्बोहायड्रेट असते. वर्कआउटच्या आधी तुम्ही हे फळ खाऊ शकता.
सकाळच्या वेळेस केळी खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते.
दुपारनंतर एखादे केळ्याचे सेवन केल्यास थकवा दूर होण्यास मदत मिळते.