www.navarashtra.com

Published August 09, 2024

By  Shweta Chavan

तूप कोणी खाऊ नये?  

तूप अतिशय पौष्टिक, आरोग्यदायी अन्न आहे. त्यातील विविध घटक शरीरासाठी उपयुक्त आहे.

पौष्टिक आणि आरोग्यदायी

आरोग्यासाठी फायदेशीर असूनही तुपाचे सेवन न करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

सेवन न करण्याचा सल्ला 

.

ज्या लोकांना लीव्हरचा आजार असल्यास त्याची क्षमता कमी होते आणि पचनावर परिणाम होतो.

यकृताची समस्या

 ऋतू बदलत असताना ताप येतो. अशा वेळी तूप खाल्ल्याने छातीत कफ होते आणि खोकला येतो. त्यामुळे तूप खाणं टाळा. 

ताप 

गरोदरपणात गर्भवती महिलेचे वजन झपाट्याने वाढते. परिणामी तुपाचे सेवन आरोग्यास हानी पोहोचवू शकते.

गरोदरपणात

पचनाशी निगडीत, पोटाशी संबंधित समस्या असल्यास तूप खाणे टाळावे. फॅटी ऍसिडस् युक्त तुपाचे सेवन केल्याने रक्तदाब वाढू शकतो. 

पोटाशी संबंधित आजार

डिस्लिपिडेमिया, फॅटी लिव्हर, हृदयविकार लोकांनी, पित्त मूत्राशय काढण्याची शस्त्रक्रिया केलेल्यांनी तूप टाळावे.

हृदयविकार

या लोकांनी तूप टाळावे 

(वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारीत आहे. तूप कोणी खावे, कोणी खाऊ नये, याबाबत आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

सकाळी उपाशीपोटी या व्यक्तींनी खाऊ नका ड्रायफ्रूट्स