Published Jan 23, 2025
By Divesh Chavan
Pic Credit - pinterest
पौष महिन्यात लग्न का केले जात नाही याबद्दल काही लोकांना प्रश्न पडतात. याच्याशी संबंधित पारंपरिक विचार आणि विश्वास आहेत.
मार्गशीर्ष महिन्यात आधीच अनेक शुभ मुहूर्त असतात, आणि हा महिना पवित्र मानला जातो, ज्यामुळे पौष महिन्यात लग्नाची संख्या कमी असते किंवा नसतेच.
पौष महिन्यात लहान दिवस आणि लवकर अंधार पडण्यामुळे, एका गावातून दुसऱ्या गावात प्रवास करणे कठीण होतं.
पूर्वीच्या काळी पौष महिन्यात लग्न न करण्याची परंपरा होती, परंतु यामध्ये अंधश्रद्धा नाही आणि प्रत्येकाच्या कर्मानुसार भविष्य घडतं.
पौष महिन्यात थंडीमुळे वातावरणात रोगजंतूंचे प्रमाण वाढते, ज्यामुळे आजारांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. म्हणून या महिन्यात आराम करण्यावर भर दिला जातो.
पौष महिन्यात गुरू आणि शुक्र ग्रहांचा अस्त असतो, आणि या ग्रहांचा नवऱ्या आणि नवरीच्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव होईल, असे मानले जाते.
पौष महिन्यात जर सूर्य धनु राशीत असेल, तर त्याला विवाहासाठी शुभ मानले जात नाही, त्यामुळे अशा वेळी लग्न टाळले जाते.
पौष महिन्यात शुभ मुहूर्त पाहून लग्न करण्याचा निर्णय घेण्यात येतो, आणि मुला-मुलींच्या पत्रिकेनुसारच लग्न ठरवले जाते.