Published Jan 23, 2025
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
जगातील सर्वात हुशार पक्षांपैकी एक म्हणजे कावळा.
तुम्ही तमच्या घराच्या आजूबाजूला कावळा उडताना पाहिला असेल.
असे मानले जाते की जेव्हा घराच्या पॅरापेटवर कावळा आवाज करतो तेव्हा ते शुभ नसते.
लहानपणी तुम्ही कावळ्याच्या अनेक गोष्टी देखील ऐकल्या असतील.
कावळ्याच्या रंगाबाबतही एक रंजक कथा आहे.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का, कावळा काळाच का असतो?
तुमच्या या प्रश्नाचं उत्तर अतिशय मजेशीर असणार आहे.
कावळा काळा कसा झाला जाणून घेऊया
अशी कथा आहे की, कावळ्याला ऋषींनी शाप दिला होता, म्हणूनच या पक्ष्याचा रंग काळा आहे.
कथेत सांगितलं जात की, कावळ्याने चोचीने अमृताचा स्रोत अपवित्र केल्याने त्याला शाप दिला होता.
ऋषींनी कावळ्याला शाप दिला होती की, कावळ्याच्या शरीराचा रंग पांढरा राहणार नाही तर काळा होईल.
हा मजकूर इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या साहित्याच्या आधारे लिहिला गेला आहे. Navrashtra या तथ्यांची पुष्टी करत नाही.