शारदीय नवरात्र देवीला समर्पित आहे. यावेळी देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते.
या काळात सोने चांदीची खरेदी करने शुभ मानले जाते. असे मानले जाते की, यामुळे घरामध्ये संपत्ती, आनंद आणि समृद्धी येते
शतकानुशतके सोने आणि चांदी केवळ संपत्तीचे प्रतीक म्हणून नव्हे तर दैवी ऊर्जा आणि शुद्धतेचे प्रतीक म्हणून देखील मौल्यवान मानली जात आहे.
हिंदू संस्कृतीनुसार सोन्याचा संबंध संपत्तीची देवी लक्ष्मीशी आहे आणि तो घरात समृद्धी आणतो असे मानले जाते.
चांदीचा संबंध चंद्राशी जोडलेला आहे. हे शांती आणि भावनाचा प्रतीक आहे. याचा संबंध देवी सरस्वतीशी देखील संबंधित असल्याचे मानले जाते.
नवरात्रीच्या काळाच सोने चांदी खरेदी केल्याने ती एक वस्तू नसून त्यामध्ये एक शुभ उर्जेचा समावेश असतो.
या गोष्टी खरेदी केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि घरामध्ये समृद्धी येते
विशेषतः अष्टमी, नवमी आणि दसऱ्याला सोने चांदीची खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. यामुळे घरात लक्ष्मी येते.
नवरात्रीच्या काळात शक्तीपूजेदरम्यान सोन्याचे दागिने घालणे किंवा खरेदी करणे शक्ती आणि आत्मविश्वास वाढवते.