शेवग्याच्या शेंगांचा आमटी, सांबार किंवा भाजीमध्ये वापर केला जातो.
शेवग्याच्या शेंगा खाण्याचे फायदे आपण जाणून घेऊयात.
शेंगांमध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्वे ए, सी, के, बी तसेच खनिजे- लोह, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आहे. त्या फायबर आणि प्रथिने यांचा चांगला स्रोत आहेत. त्यामुळे गर्भवती महिलांनी आवर्जून शेंगा खाव्यात.
शेवग्याच्या शेंगांमुळे पोटाच्या सगळ्या समस्या दूर होतात.
शेवग्याच्या शेंगांच्या सेवनामुळे डोळे निरोगी राहण्यासाठीही मदत होते.
पुरुषांची प्रजनन क्षमता वाढवण्यासाठीही शेवग्याच्या शेंगा खाण्याचा सल्ला दिला जातो.
रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठीही शेवग्याच्या शेंगा उपयुक्त ठरतात.
शेवग्याच्या शेंगांमध्ये खनिजे कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस असल्याने हाडे मजबूत होतात.
शेंगांमधील कोलेजेन प्रोटीनमुळे त्वचा मऊ होते.शेवग्याची पाने किंवा शेंगाची पावडर रक्त शुद्ध करण्यास मदत करते आणि त्वचा निरोगी करते.