बाप्पाला का अर्पण करतात दूर्वा आणि लाल रंगाची फुलं ?
दूर्वा, जास्वंदीची फुलं आणि मोदक या बाप्पाच्या आवडीच्या गोष्टी.
त्यामुळे गणपतीची पूजा करताना 21 दुर्वांची जुडी, 21 मोदक आणि जास्वंदीची लाल फुलं अर्पण केली जातात.
गणपतीला दूर्वा, जास्वंद किंवा लाल रंगाची फुलं का वाहिली जातात ? हे आपण जाणून घेऊयात.
आपल्याकडे प्रत्येक देवाला विशिष्ट फुलं, पत्री वाहण्याची प्रथा आहे.
सगळ्या देवतांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ते तत्व आपल्यापर्यंत जास्तीत जास्त पोचावं यासाठी आपण त्यांचं पूजन करतो.
दूर्वांमध्ये श्री गणेशाचे तत्त्व जास्तीत जास्त प्रमाणात आकृष्ट करून घेण्याची क्षमता असते. त्यामुळे गणपतीला दूर्वा वाहिल्या जातात.
गणपतीच्या पूजेत लाल वस्त्र, जास्वंदीसारखे लाल फूल, रक्तचंदन यांसारख्या लाल वस्तू वापरतात. याचे कारण म्हणजे गणपतीचा वर्ण शेंदरी / लाल आहे.
पूजेत वापरलेल्या वस्तूंच्या लाल रंगामुळे गणेशाचे तत्त्व मूर्तीकडे जास्त प्रमाणात आकृष्ट होते.