प्रत्येक रेल्वे स्थानकावर असलेल्या बोर्डच्या तळाशी समुद्रसपाटीपासून उंचीबद्दल लिहिलेले असते.
ही माहिती का लिहिली जाते, याबद्दल आता आपण जाणून घेऊया.
प्रत्येक रेल्वे स्टेशनवर असलेल्या बोर्डवर इंग्रजी आणि हिंदीमध्ये समुद्रसपाटीपासून उंचीबद्दल लिहिलेले असते.
समुद्रसपाटीपासून या ठिकाणाची उंची किती आहे, ही माहिती लोकोपायलटसाठी लिहिली जाते.
या माहितीनुसार लोको पायलट पॉवर आणि टॉर्क जनरेट करण्यासाठी इंजिनला कमांड देऊ
शकतात.
इंजिनचा वेग समान पातळीवर ठेवायचा असेल, तर उंचीनुसार योग्य टॉर्क आणि पॉवर असणे आवश्यक आहे.
रेल्वे स्थानकावर पिवळ्या रंगाचे फलक का असतात, याबद्दल सगळ्यांना उत्सुकता असते.
काही खास कारणांसाठी रेल्वे स्थानकांवर पिवळ्या रंगाचे फलक वापरले जातात.
लोको पायलटला स्टेशनवर पोहोचण्याआधीच दुरून एक पिवळा बोर्ड आणि त्यावर लिहीलेले स्टेशनचे नाव दिसते.