टायरचा रंग फक्त 'काळाच' का असतो? जाणून घ्या नेमकं कारण
जगात, चाकाचा शोध हा मानवी सभ्यतेचा सर्वोत्तम शोध मानला जातो. या शोधाने मानवी जीवनाला दिलेली गती अव्याहतपणे सुरू आहे.
सर्वप्रथम दगड त्यानंतर लाकडी चाकांनी रबरापासून बनवलेल्या टायर्सचे रूप धारण केले तेव्हा ते क्रांतिकारक बदल होते. टायर्सचा इतिहास 175 वर्षांहून अधिक जुना आहे.
जगाला टायर देण्याचे श्रेय महान शोधक स्कॉटिश अभियंता आणि उद्योजक रॉबर्ट विल्यम थॉमसन यांना जाते, ज्यांनी 1846 मध्ये जगातील पहिल्या रबर टायरचा शोध लावला.
जॉन बॉयड डनलॅप यांनी 1888 मध्ये वायवीय (Pneumatic) हवेने भरलेल्या टायरचा शोध लावल्याचा दावा केला, रॉबर्ट थॉमसनने 1846 मध्ये टायर डिझाइनचे पेटंट आधीच घेतले होते हे त्यांना माहीत नव्हते.
तथापि, आपणा सर्वांना टायर्स परिचित आहेतच, परंतु आपण कधी लक्षात घेतले आहे की वाहनाचा रंग कोणताही असो, टायरचा रंग नेहमी काळा (Black) का असतो? तुम्ही आजपर्यंत विचार केला नसेल तर पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या संपूर्ण सत्य-
तथापि, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सुमारे 125 वर्षांपूर्वी टायरचा रंग पांढरा असायचा, कारण टायर ज्या रबरपासून बनवले जाते तो पांढऱ्या (Milky White) असतो.
टायर काळे असण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यात असलेले कार्बन कंपाऊंड. याशिवाय यामध्ये कार्बन ब्लॅकचाही प्रामुख्याने वापर करण्यात आला आहे.
टायरच्या निर्मितीमध्ये अनेक प्रकारची रसायने मिसळली जातात. त्याच्या मूळ पदार्थाचा रंग पांढरा असला तरी वाहनांमध्ये वापरता येण्याइतका मजबूत नसतो.
त्यामुळे टायरच्या निर्मितीमध्ये 'कार्बन-ब्लॅक' मिसळले जाते आणि म्हणूनच टायरचा रंग काळा होतो. यामुळे टायरची गुणवत्ता सुधारते.
रबरमध्ये कार्बन ब्लॅक वापरला नाही तर ऊन आणि उष्णता रबर खराब करतात. टायरच्या रबरला खराब होण्यापासून वाचवण्यात कार्बन ब्लॅक महत्त्वाची भूमिका बजावते.
जेव्हा वाहन चालत असते तेव्हा टायर वेगाने गरम होतो, अशावेळी कार्बन ब्लॅकमुळे उष्णता कमी होण्यास मदत होते आणि टायर वितळत नाही. एवढेच नाही तर कार्बन ब्लॅक टायर्सचे ओझोन आणि अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणोत्सर्गाच्या हानिकारक प्रभावांपासून संरक्षण करते.
टायर हा कोणत्याही वाहनाचा सर्वात महत्वाचा घटक असतो, तो वाहनाला वेग देतोच पण संपूर्ण वाहनाचे वजनही वाहतो. अशा परिस्थितीत त्याच्या बळावर कोणतीही तडजोड होऊ शकत नाही.