नरक चतुर्दशीला कारिट फोडण्यामागे काय आहे कारण ?
दिवाळी हा सण सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो.
दिवाळीतल्या प्रत्येक दिवसाचं वेगळं महत्त्व आहे.
नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नानापूर्वी डाव्या पायाच्या अंगठ्याने कारिट हे फळ फोडण्याची पद्धत आहे.
कारिट हे फळ फोडण्यामागचं कारण पौराणिक कथांमध्ये सांगण्यात आलं आहे.
असं म्हटलं जातं की नरक चतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता.
नरकासुराचा प्रतिकात्मक वध म्हणून घराबाहेर किंवा तुळशीजवळ कारिट फोडलं जातं.
या प्रतिकात्मक वधामुळे कडवटपणा आणि दुष्टता नष्ट होते,असं मानलं जातं.
कटुता संपवून मग अभ्यंगस्नानाने पवित्र होऊन दिवाळी सण आनंदाने साजरा केला जातो.