Published Sept 20, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
लिफ्टमध्ये आरसा का लावला जातो?
लिफ्टमध्ये नक्की आरसा का असतो? चेहरा पाहण्यासाठी नाही तर याचं एक वेगळे आणि मोठे कारण आहे
मेट्रोपासून ऑफिस, मॉल्स सगळीकडे लिफ्ट्स असतात आणि त्यात आरसाही असतो
लिफ्टच्या आतमध्ये बरेचदा आरसा लावलेला आपल्याला दिसून येतो, पण याचे नक्की कारण काय
.
सुरूवातीला लिफ्टचा वेग हा खूपच जास्त असल्याने लोकांना भिती वाटत होती
.
त्यामुळे सर्वांचे लक्ष हे केवळ लिफ्ट वर आणि खाली जाताना त्याच्या वेगाकडे असायचे
लिफ्टमधील लोकांचे लक्ष वळविण्यासाठी लिफ्टमध्ये आरसा लावण्यात आला
आरसा लावल्यानंतर लोकांचं लक्ष आरशात पाहण्याकडे वळवू लागले. त्यामुळे लिफ्टकडे लक्ष कमी जाऊ लागले
क्लोस्टोफोबिया असलेल्या व्यक्तींना काचेमुळे लिफ्ट मोठी आहे असे वाटते आणि भीती कमी होते