Published Sept 25, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - Pinterest
तांदळाचा कलश नवरीने पायाने का ओलांडावा?
लग्नानंतर गृहप्रवेश करताना तांदळाचा कलश नवरीने पायाने का ओलांडायचा? यामागील कारण घ्या जाणून
भोपाळमधील पंडित ज्योतिषाचार्य विनोद सोनी यांनी यामागील महत्त्व सांगितले आहे, प्रत्येकाला माहीत असायला हवे
हिंदू धर्मात तांदळाला अनन्यसाधारण महत्त्व असून स्थिरतेचे प्रतीक आहे. म्हणूनच तांदळाचा कलश गृहप्रवेश करताना ठेवला जातो
.
नवरीने नेहमी उजव्या पायानेच हा तांदळाचा कलश ओलांडावा असं सांगण्यात येते
.
नवरी जेव्हा कलशाला पाय लावते तेव्हा सर्व तांदूळ सांडून पसरतात, याचाच अर्थ ती घरात आयुष्याभरासाठी सुखसमृद्धी घेऊन येते
हा कलश नवरीने ओलांडला आणि तांदूळ पसरले म्हणजे घरातील नकारात्मकता दूर होऊन आनंदाचे दरवाजे उघडले
हिंदू धर्मानुसार ही परंपरा अत्यंत लाभदायक मानली जात असून घरातील सर्वांना यश मिळते असंही मानले जाते
उजवा पाय हा सकारात्मकता दर्शवत असून या पायाने तांदूळ पाडल्यास शुभ फळ प्राप्त होते
डाव्या पायाचा कधीही वापर करू नये कारण या पायासह नकारात्मकता घरात येते असा समज आहे
ही माहिती ज्योतिषशास्त्रानुसार असून आम्ही कोणताही दावा करत नाही