ओलं खोबरं खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का ?

दरवर्षी 2 सप्टेंबरला World Coconut Day साजरा होतो.

ओलं खोबरं खाण्याचे अनेक फायदे आहेत.

नारळ खाल्ल्याने शरीराला तांबे, सेलेनियम, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त मिळते. इतकंच नाही तर नारळात व्हिटॅमिन सी आणि फोलेटही आहे.

दररोज जर तुम्ही खोबरं खाल्लं तर तुमचं कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.

खोबरं खाल्ल्याने फॅट बर्न होऊन वजन कमी करण्यासही मदत होईल.

पचनाची समस्या दूर करण्यासाठीही खोब-याचं सेवन उपयुक्त ठरतं.

केस आणि त्वचा चमकदार आणि मुलायम होण्यासाठीही ओलं खोबरं फायदेशीर आहे.

नारळाच्या सेवनाने शरीराला अँटीव्हायरल गुणधर्म असल्याने शरीरातील इन्फेक्शन्स दूर होतात. नारळात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असतात.