भारतातलं हत्तींचं पहिलं गाव

 दरवर्षी 12 ऑगस्ट हा दिवस जागतिक हत्ती दिन म्हणून साजरा केला जातो.

हत्तींची संख्या सातत्याने कमी होतेय. संपूर्ण जगाचे लक्ष हत्ती संवर्धनावर केंद्रित करण्यासाठी जागतिक हत्ती दिन साजरा केला जातो.

जागतिक हत्ती दिनानिमित्त भारत देशातील पहिल्या हत्तींच्या गावाविषयी आपण जाणून घेऊयात.

जयपूरमधील आमेरजवळ ‘हाथी’(हत्ती) नावाचं गाव आहे.

साधारणपणे 100 एकरात वसलेल्या या गावात पर्यटकांना हत्तींसोबत वेळ घालवता येतो.

अरवली पर्वताच्या पायथ्याशी वसलेले हत्ती गाव हे पर्यटकांचे आकर्षण आहे.

हे जगातलं तिसरं आणि भारतातलं पहिलं हत्तींचं गाव आहे. 

या गावात शंभरपेक्षा जास्त हत्ती राहतात.

हत्तीवर बसून फिरणं, त्यांना आंघोळ घालणं हे तुम्ही या ठिकाणी करू शकता. तुम्ही त्यांना खायलाही घालू शकता.

हत्तींची संख्या कमी होत असताना हत्तींसाठी एक गाव अस्तित्वात असणं ही कौतुकास्पद बाब आहे.