जगात बरेचजण त्यांच्या दिवसाची सुरुवात चहाने करतात. 

प्रत्येकाला वेगवगेळ्या चवीचा, वेगवेगळ्या ब्राण्डचा चहा आवडतो. 

 हे आहेत जगातील सर्वात महागडे 5 चहा, त्यांची किंमत ऐकूनच थक्क व्हाल.

 एका चहाच्या किमतीमध्ये तुम्ही 1 कोटी किमतीचे 9 लक्झरी फ्लॅट खरेदी करू शकता.

चीनच्या फुजियान प्रांतातील वुई पर्वतांमधील दा-हॉंग-पाओ-चहा हा जगातील सर्वात महाग चहा आहे.

एक किलो चहाची किंमत 1.2 मिलियन डॉलर म्हणजेच 9 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 

दुसऱ्या क्रमांकावर चीनचा पांडा-डंग चहा आहे, ज्याच्या लागवडीसाठी पांडा अस्वलाचे शेण वापरले जाते.

एक किलो चहाची किंमत सुमारे 70,000 डॉलर म्हणजेच 57 लाख रुपयांहून अधिक आहे. 

तिसऱ्या क्रमांकावर सिंगापूरचा यलो गोल्ड टी बड्स हा चहा येतो.

चौथ्या क्रमांकावर भारताचा सिल्व्हर टिप्स इंपीरियल चहा येतो. ज्याची किंमत सुमारे दीड लाखाच्या आसपास आहे.

पाचव्या क्रमांकावर जपानचा ग्रीन टी ग्योकुरो आहे. ज्याची किंमत जवळपास 60 हजाराच्या घरात आहे.