दिल्लीतील जंतरमंतर इथे आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंना ताब्यात घेण्यात आले.
नव्या संसदेत जाताना बॅरिकेड्स ओलांडताना पोलिसांनी त्यांना पकडले.
दिल्ली पोलिसांनी कुस्तीपटूंचे तंबूही उखडून टाकले.
या कुस्तीपटूंमध्ये फोगाट बहिणी, साक्षी मलिक, बजरंग पूनियासुद्धा होत्या.
बॅरिकेड्स ओलांडून नव्या संसदेत जाताना त्यांना पकडण्यात आले.
एवढेच नाही तर नवीन संसद भवनाजवळ महिला महापंचायतीचेही कुस्तीपटूंनी नियोजन केले होते.
या गोंधळात कुस्तीपटू आणि पोलिसांनी एकमेकांना धक्काबुक्की केली, त्यानंतर बॅरिकेड्स तोडण्यात आले.
यानंतर पोलिसांनी सर्वांना पकडून ओढले आणि नंतर ताब्यात घेऊन बसमध्ये बसण्यास भाग पाडले.
"कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून त्यांना ताब्यात घेण्यात आले," असे पोलिसांनी सांगितले.
कुस्तीपटू पुनियाने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले- आम्ही आमच्या स्वाभिमानाची लढाई लढत आहोत.
ते म्हणाले- केंद्राने नव्या संसदेचे उद्घाटन केले, पण देशातील लोकशाहीची हत्या केली.