Published Nov 20, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
मानव आणि कुत्रा यांच्यातील मैत्रींची अनेक उदाहरण आपण आतापर्यंत पाहिली आहेत.
कुत्रा हा मानवांसाठी सर्वात निष्ठावान प्राणी मानला जातो.
भारतात गेल्या काही वर्षांत कुत्रे पाळण्याचा ट्रेंड वाढला आहे. विशेषतः शहरी भागात हे प्रमाण अधिक आहे.
भारतात कुत्रा पाळण्यावर कोणताही कर भरावा लागत नाही.
पण एक असा देश आहे, जिथे तुम्हाला कुत्रा पाळायचा असेल तर तुम्हाला त्यासाठी कर भरावा लागेल.
कुत्रे पाळण्यावरील करातून या देशाचे सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये कमावते.
जर्मनीमध्ये कुत्रा पाळल्यास सरकारला टॅक्स भरावा लागतो. मात्र तरीही तिथे कुत्रे पाळणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
या कराला स्थानिक भाषेत 'हुंडेशटोयर' म्हणतात.
2023 मध्ये, जर्मन सरकारने कुत्र्यांच्या मालकांकडून सुमारे 421 दशलक्ष युरो म्हणजेच सुमारे 38,25,50,07,000 रुपये कर जमा केला.
2022 मध्ये, जर्मन सरकारने कुत्र्यांच्या मालकांकडून सुमारे 414 दशलक्ष युरो कर वसूल केला.