‘नवराष्ट्र’ महिला पुरस्कार सोहळयाचे २४ जुलै रोजी वितरण ; पुण्यात रंगणार दिमाखदार सोहळा

राज्यातील विविध जिल्ह्यातून विविध महिला पुरस्काराचे मानकरी ठरल्या आहेत.हा पुरस्कार सोहळा २४ जुलै रोजी पुणे येथील रामदा हॉटेल येथे पार पडणार आहे.

    पुणे : महिला सक्षमीकरणासाठी आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ‘नवभारत’ वृत्तपत्र समुहाचा ‘नवराष्ट्र महिला पुरस्कार’ जाहीर झाला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यातून विविध महिला पुरस्काराचे मानकरी ठरल्या आहेत.हा पुरस्कार सोहळा २४ जुलै रोजी पुणे येथील रामदा हॉटेल येथे पार पडणार आहे.

    या पुरस्कार सोहळ्यास विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे,खासदार डॉ. अमोल कोल्हे,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, औरंगाबादच्या जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते,सामाजिक कार्यकर्त्या सुनेत्रा पवार, डॉ सुनंदा नवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे.

     

    -‘या’ महिला शिलेदारांना दिला जाणार ‘नवराष्ट्र’ महिला पुरस्कार

    ब्रम्हकुमारी त्रिवेणी दीदी, कल्पना थोरवे, इप्सिता दास, सुलक्षणा क्षीरसागर, अल्पना गणेश वरपे, वैशाली शिंदे, अनिता गणेश खरात, छाया मोहन शितोळे, रेश्मा प्रकाश नेवसे, हिना अजरुद्दीन शेख, वंदना सोमनाथ होळकर, शीतल कटारीया, अर्चना ज्ञानदेव राजणे, रुपाली राक्षे, अनुराधा प्रभाकर देशमुख, सुवर्णा सुनील पोरे, रमाताई सखाराम तोरणे, रोहिणी उमेश शिंदे, चंचल पाटील, स्वाती पाटील, शीतलदेवी मोहीते पाटील, डॉ. स्मिता पाटील, सोनल संतोष गुळमिरे, अॅड. रामेश्वरी माने, मंगल दिलीप कोल्हे, क्रांतीताई प्रशांत गाढवे, मंदाकिनी संपत साकोरे, स्नेहल प्रथमेश जवळेकर, डॉ. प्राची संजय घुणके, डॉ. स्मिता नितीन माळी, अंजना येवले, कविता आव्हाड, डॉ. शिवांगी शिवाजी पवार, हर्षदा विनोद जाधव, गायत्री छाबरीया, मोक्षदा पाटील, तेजस्वी पाटील, जान्हवी धारीवाल, प्रा. सुनीता कराड, डॉ. शीतल उदय पवार, ॲड शुभांगी मच्छिंद्र तरस, पौर्णिमा किशोर ठाकूर, कश्मिरा महेंद्र परदेशी, श्वेता शालिनी, डॉ. सुरेखा मुडे, निर्मलाताई पानसरे,शर्वरी विजय डोंबे.

    हा सोहळा ‘नवराष्ट्र’च्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ‘लाईव्ह’ बघता येणार आहे. यासाठी नवराष्ट्रच्या Facebook Page  आणि पोर्टलवर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

    FacebookPage : https://www.facebook.com/navarashtra/

    Live Event :  https://fb.me/e/18wKCrFxc

    Navarashtra WebSite : https://www.navarashtra.com/women-achievers-awards-news-marathi/

    तसेच याबाबत अजून सविस्तर माहिती व अपडेट्स जाणून घेण्यासाठी   https://www.navarashtra.com  येथे क्लिक करा.