marriage

आता काळाबरोबर कंपनीने जोड्या जुळवण्यासाठी नवा मार्गही शोधला आहे. नुकतेच कंपनीने टोकियोजवळील गिंजा येथे अशी पहिली मॅचमेकिंग पार्टी आयोजित केली. तिथे 26 जणांना आपला जीवनसाथी मिळाला. इथे जमवलेल्या जोड्यांमधील समानतेचे सरासरी प्रमाण 80 टक्के होते. एक जोडपे तर 98 टक्क्यांबाबत एकमेकांसारखे होते. या जोडप्यातील पुरुष 41 वर्षांचा तर महिला 32 वर्षांची आहे.

    दिल्ली : कुंडली बघून किंवा रक्‍तगट बघून लग्‍न जुळवणे हे आपल्या देशात नवे नाही. जपानमधील एक कंपनी मात्र ‘डीएनए’ पाहून जोड्या जमवते. या मॅचमेकिंग कंपनीची सेवा तिकडे चांगलीच लोकप्रिय झाली आहे. ‘नोज्जे’ नावाच्या या ‘वधू-वर सूचक’ कंपनीची दर महिन्याला सुमारे 200 तरुण-तरुणी सेवा घेत आहेत. लग्‍न जुळवण्याच्या व्यवसायात ही कंपनी गेल्या 25 वर्षांपासून काम करत आहे.

    आता काळाबरोबर कंपनीने जोड्या जुळवण्यासाठी नवा मार्गही शोधला आहे. नुकतेच कंपनीने टोकियोजवळील गिंजा येथे अशी पहिली मॅचमेकिंग पार्टी आयोजित केली. तिथे 26 जणांना आपला जीवनसाथी मिळाला. इथे जमवलेल्या जोड्यांमधील समानतेचे सरासरी प्रमाण 80 टक्के होते. एक जोडपे तर 98 टक्क्यांबाबत एकमेकांसारखे होते. या जोडप्यातील पुरुष 41 वर्षांचा तर महिला 32 वर्षांची आहे.

    आम्ही एकमेकांना चांगलेच ‘मॅच’ होतो असे समजल्यावर मग बोलणे सोपे झाले असे महिलेने सांगितले. कुणी इतक्या प्रमाणात एकमेकांसारखे असते हे यामुळे प्रथमच समजले असे विवाहेच्छुक पुरुषाने सांगितले. ‘नोज्जे’ची ही सेवा घेण्यासाठी 21 हजार रुपयांचे शुल्क भरावे लागते. तसेच डीएनए मॅचिंगसाठी वेगळे 34 हजार रुपये द्यावे लागतात. कंपनी डीएनए टेस्टिंगसाठी त्यांचे नमुने शिनागावा लॅबमध्ये पाठवून रिपोर्ट मागवते. या चाचणीत एचएलए जीन कॉम्प्लेक्स पाहून गुण ठरवले जातात.