काबूल विमानातळ हल्ल्याच्या कटात १४ भारतीयांचा समावेश?

२०१४ मध्ये मोसूलमध्ये इस्लामिक स्टेटचा कब्जा झाल्यानंतर मलप्पुरम, कासरगोड आणि कन्नुर जिल्ह्यातील एक समूह भारत सोडून गेला होता. तेव्हा यातील काही कुटुंबांनी आयएकेपीमधून अफगाणिस्तानमधील नंगरहार प्रांतात राहू लागले होते. यांचा वापर करून तालिबान आणि त्यांचे सहकारी भारताच्या प्रतिमेला नुकसान करू शकण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे

    काबूल: अफगाणिस्तानातील काबूल विमानतळाबाहेर झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटातील १७० होऊन अधिक लोक मृत्युमुखी पडले आहे. त्यामध्ये १३ अमेरिकेच्या जवानांचाही मृत्यू झाला आहे. अशातच एक खळबळजन बातमी समोर आली आहे, इसिस या हल्लेखोरांच्या संघटनेमध्ये केरळमधील १४ जणांचा समावेश आहे. तालिबानने बगराम जेलमधून या सर्वाना मुक्त केले होते. तसेच तुर्कमेनिस्तानच्या दुतावासावर हल्ल्याचा प्रयत्न करत असलेल्या दोन पाकिस्तानींना ताब्यात घेण्यात माहिती समोर आली आहे.

    २०१४ मध्ये मोसूलमध्ये इस्लामिक स्टेटचा कब्जा झाल्यानंतर मलप्पुरम, कासरगोड आणि कन्नुर जिल्ह्यातील एक समूह भारत सोडून गेला होता. तेव्हा यातील काही कुटुंबांनी आयएकेपीमधून अफगाणिस्तानमधील नंगरहार प्रांतात राहू लागले होते. यांचा वापर करून तालिबान आणि त्यांचे सहकारी भारताच्या प्रतिमेला नुकसान करू शकण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.मात्र या सगळ्याबाबत अद्यापही स्पष्ट माहिती समोर येऊ शकलेली नाही.