मोठी बातमी ! अफगाणिस्तानातील 150 भारतीय तालिबान्यांच्या ताब्यात, काबूल विमानतळावर नक्की काय घडलं?

मागील काही दिवसांपासून भारतीयांची सुटका करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रणनीती आखण्यात येत आहे. सकाळी 10.30 वाजता 85 भारतीयांना घेऊन भारतीय हवाई  दलाचं C-130J विमान भारतात परतत आहे. असे सांगितले जात आहे. परंतु उर्वरीत भारतीय नागरिक काबूल विमानतळावर प्रतीक्षेत होते. मात्र,  अफगाणिस्तानात 150 भारतीय नागरिकांचं अपहरण केल्याची माहिती समोर येत आहे. 

    अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांकडून संपूर्ण शहरांवर कब्जा करण्यात आला आहे. मागील काही दिवसांपासून भारतीयांची सुटका करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रणनीती आखण्यात येत आहे. सकाळी 10.30 वाजता 85 भारतीयांना घेऊन भारतीय हवाई  दलाचं C-130J विमान भारतात परतत आहे. असे सांगितले जात आहे. परंतु उर्वरीत भारतीय नागरिक काबूल विमानतळावर प्रतीक्षेत होते. मात्र,  अफगाणिस्तानात 150 भारतीय नागरिकांचं अपहरण केल्याची माहिती समोर येत आहे.

    आम्ही भारतीयांचं अपहरण केलंलं नाही, आम्ही त्यांना सुरक्षित स्थळी नेलं आहे, असा दावा तालिबान्यांच्या प्रवक्त्यांनी केलेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंतर्गत संघर्ष तालिबानमध्ये आणि अफगाणिस्तानमध्ये खूप मोठा आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आपलं शक्तीप्रदर्शन करण्यासाठी म्हणून भारतीयांना भोगावा लागू शकतो. परंतु तालिबान्यांच्या तावडीतून भारतीयांची सुटका करणं. हे आता भारताला मोठं आव्हान ठरणार आहे. मात्र, तालिबान्यांवर विश्वास ठेवायचा कसा? हा देखील मोठा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.