2025 will be the hottest year on record

हवामान बदल ही एक गुंतागुंतीची व वैश्‍विक घटना श्रुंखला आहे. ह्यातून अनेक प्रश्‍न व समस्या उगम पावतात. आता पृथ्वीवर असेच एक संकट ओढवणार आहे. येत्या 5 वर्षात पृथ्वीचे तापमान 40 टक्के वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा जागतिक हवामान संघटनेने दिला आहे. या संस्थेच्या वैज्ञानिकांनी असेही म्हटले आहे की, 2025 सर्वाधिक उष्ण वर्ष होण्याचा रेकॉर्ड ब्रेक करेल.

  जिनेवा : हवामान बदल ही एक गुंतागुंतीची व वैश्‍विक घटना श्रुंखला आहे. ह्यातून अनेक प्रश्‍न व समस्या उगम पावतात. आता पृथ्वीवर असेच एक संकट ओढवणार आहे. येत्या 5 वर्षात पृथ्वीचे तापमान 40 टक्के वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा जागतिक हवामान संघटनेने दिला आहे. या संस्थेच्या वैज्ञानिकांनी असेही म्हटले आहे की, 2025 सर्वाधिक उष्ण वर्ष होण्याचा रेकॉर्ड ब्रेक करेल.

  जागतिक हवामान संघटनेने येत्या 5 वर्षात जगभरात होणाऱ्या हवामान बदलाची भविष्यवाणी केली आहे. 2025 पुन्हा सर्वाधिक उष्ण वर्ष असल्याचा रेकॉर्ड ब्रेक करू शकतो, असा दावाही संघटनेने केला आहे. कारण पुढील 5 वर्षात पृथ्वीचे तापमान 40 टक्के वाढू शकते. याशिवाय अटलांटिक महासागरात भीतीदायक पातळीचे चक्रीवादळ होण्याची शक्यता आहे.

  तापमानात दुप्पट वाढ म्हणजे तंत्रज्ञान बदलणे

  उत्तर ध्रुवाजवळील देशांचे तापमान 0.8 डिग्री सेल्सियस वाढेल, अशीही भविष्यवाणी संघटनेने केली आहे. हे तापमान गत काही दशकांपेक्षा अधिक आहे. अमेरिकेतील दक्षिण-पश्चिममध्ये सुरु असलेला दुष्काळ पुढेही त्याच स्थितीत राहील. डब्लूएमओने आपल्या अहवालात सांगितले की, येत्या 5 वर्षांमधून एखाद्या वर्षाचे तापमान औद्योगिक काळाच्या तुलनेत 1.5 डिग्री सेल्सियस अधिक राहील. या प्रकरणात पॅरिस पर्यावरण करारांतर्गत ग्लोबल वार्मिंग कमी करण्याच्या सर्व प्रयत्न उघडकीस येतील. सद्यस्थितीत जग औद्योगिक काळाच्या तुलनेत 1.2 डिग्री सेल्सियस अधिक उष्ण आहे. ग

  तवर्षी याच संघटनेने 40 टक्केऐवजी 20 टक्के अधिक उष्ण होण्याची भविष्यवाणी केली होती. यूनायटेड किंगडमचे हवामानशास्त्रज्ञ लियो हर्मेन्सन यांनी सांगितले की, तापमानात दुप्पट वाढ म्हणजे तंत्रज्ञान बदलणे. म्हणजेच असे तंत्रज्ञान जे बदलत आहे, परंतु यामुळे उष्णता देखील वाढली आहे. ध्रुवीय भागाकडे आम्ही कधीच लक्ष दिले नाही. तेथील स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. सर्व देश आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पर्यावरण आणि पृथ्वी वाचविण्यासाठी कठोर पावले उचलली पाहिजेत.

  समुद्री जलस्तरात होताहे वाढ

  संघटनेचे सेक्रेटरी जरनल प्रोफेसर पेटेरी टालस यांनी सांगितले की, हे केवळ आकडे नाही तर त्यापेक्षा अधिक जास्त आहेत. सतत वाढणाऱ्या तापमानामुहे बर्फ वितळत आहे. समुद्री जलस्तरात वाढ होत आहे. अधिक उष्माघात पाहिले जात आहे. हवामान खराब होत आहे. यामुळे जगभरातील लोकसंख्येला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल. भोजन, आरोग्य, पर्यावरण आणि विकास या चारही गोष्टींवर याचा परिणाम पडेल. युकेमध्ये 11 ते 13 जूनला होणाऱ्या जी-7 लीडर्स समिटमध्ये पर्यावरणासंदर्भात गंभीर चर्चा होणार आहे, असे सांगितले जात आहे. कारण जगातील 10 देशांनीही डब्ल्यूएमओप्रमाणेच भविष्यवाणी केली आहे. या देशांमध्ये स्पेन, जर्मनी, कनाडा, चीन, अमेरिका, जापान, ऑस्ट्रेलिया, स्वीडन, नॉर्वे और डेनमार्कचा समावेश आहे. परंतु, केवळ हे देश एकत्र येऊन काहीही होणार नाही. तर यासाठी जगातील सर्व देशांना एकत्र यावे लागेल.