air force plane crash

मंत्री अँटोन गेराशेन्को म्हणाले की, या अपघातात २२ जण ठार तर दोन जखमी झाले आहेत. आणखी दोन जणांचा शोध सुरू आहे. ते म्हणाले की, परिवहन विमानात २८ लोक होते. त्यापैकी २१ सैनिकी विद्यार्थी होते तर ७ विमानाचे चालक दलात होते. मंत्री म्हणाले की अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

युक्रेन : युक्रेनमधील हवाई दलाच्या विमानाचा (Air Force plane crash) शुक्रवारी अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात लष्करी कॅडेटसह ( cadets )  २२ जण ठार झाले. त्याचवेळी दोन लोक गंभीर जखमी (2 injured) झाल्याची माहिती आहे. युक्रेनच्या पूर्व भागात खार्किव्ह भागात हा अपघात झाला. युक्रेनच्या एका मंत्र्याने अपघाताची माहिती दिली आहे.

मंत्री अँटोन गेराशेन्को म्हणाले की, या अपघातात २२ जण ठार तर दोन जखमी झाले आहेत. आणखी दोन जणांचा शोध सुरू आहे. ते म्हणाले की, परिवहन विमानात २८ लोक होते. त्यापैकी २१ सैनिकी विद्यार्थी होते तर ७ विमानाचे चालक दलात होते. मंत्री म्हणाले की अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी शनिवारी या प्रांताचा दौरा करणार असल्याचे म्हटले आहे.


त्यांनी फेसबुकवर लिहिले आहे की या दुर्घटनेची तातडीने चौकशी करण्यासाठी ते एक कमिशन तयार करीत आहेत. हे आयोग अपघाताचे कारण शोधून काढेल. अँटोनोव्ह -२६ वाहतूक विमान चुहीव सैन्य विमानतळापासून दोन किलोमीटर (१ मैल) अंतरावर स्थानिक वेळेनुसार रात्री ८:५० वाजता कोसळले असल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर विमानात आग लागली. आगीवर ताबा मिळविण्यासाठी तासाभराचा कालावधी लागला. या अपघातात २२ जणांचा मृत्यू झाला. दोन गंभीर जखमी आहेत.