२३ वर्षांनी लहान गर्लफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ; बोरिस जॉन्सन तिसऱ्यांदा अडकले विवाहबंधनात

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कॅरी सायमंड्स यांच्यासोबत एका सिक्रेट सेरेमनीमध्ये लग्नगाठ बांधली आहे. ब्रिटिश माध्यमांच्या म्हणण्यानुसार, हा सोहळा शनिवारी वेस्टमिंस्टर कॅथेड्रलमध्ये आयोजित केला गेला होता. जॉन्सन यांच्या डाउनिंग स्ट्रीट ऑफिसच्या महिला प्रवक्त्यानं यावर काहीही बोलण्यात नकार दिला आहे.

    लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी कॅरी सायमंड्स यांच्यासोबत एका सिक्रेट सेरेमनीमध्ये लग्नगाठ बांधली आहे. ब्रिटिश माध्यमांच्या म्हणण्यानुसार, हा सोहळा शनिवारी वेस्टमिंस्टर कॅथेड्रलमध्ये आयोजित केला गेला होता. जॉन्सन यांच्या डाउनिंग स्ट्रीट ऑफिसच्या महिला प्रवक्त्यानं यावर काहीही बोलण्यात नकार दिला आहे. दरम्यान ब्रिटिश वृत्तपत्र द सन आणि मेल ऑन संडेच्या वृत्तानुसार, सर्व पाहुण्यांना ऐनवेळीच आमंत्रण पाठवण्यात आलं. इतकंच नाही तर जॉन्सन यांच्या ऑफिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनादेखील या लग्नाबाबत काहीही माहिती नव्हती. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमध्ये सध्या लग्नसमारंभात केवळ 30 लोकांनाच सहभागी होण्याची परवानगी मिळते.

    दरम्यान 56 वर्षीय बोरिस जॉन्सन 2019 पासून पंतप्रधान झाल्यापासूनच डाउनिंग स्‍ट्रीटमध्ये 33 वर्षीय कॅरी सायमंड्स यांच्यासोबत राहातात. मागील वर्षीच दोघांनी आपल्या नात्याविषयीची घोषणा केली होती. तसंच त्यांनी आपल्या होणाऱ्या बाळाविषयीही माहिती दिली होती. एप्रिल 2020 मध्ये त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं होतं. त्याचं नाव विलफ्रेड लॉरी निकोलस जॉनसन असं आहे.

    ब्रिटिश वृत्तपत्र द सननं या महिन्याच्या सुरुवातीलाच असं वृत्त दिलं होतं, की कुटुंबीय आणि मित्रांना या दोघांच्या लग्नाचं आमंत्रण जुलै 2022 साठी पाठवण्यात आलं होतं. बोरिस जॉन्सन यांचं खासगी आयुष्य बरंच गुंतागुंतीची होतं. विवाहबाह्य संबंधांबाबत खोटं बोलल्याप्रकरणी एकदा त्यांना कंजर्वेटिव पार्टीच्या पॉलिसी टीममधून बरखास्त करण्यात आलं होतं. त्यांचा दोन वेळा घटस्फोटही झाला आहे.