कोरोनाचे 26 रुग्ण पण तरीही ‘या’ शहरात केलं लॉकडाऊन ; काय आहे यामागचं नेमकं कारण

मेलबर्न शहरात फक्त 26 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. शहराची लोकसंख्या 50 लाखांच्या आसपास आहे. इतक्या कमी प्रमाणात रुग्ण असतानाही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

    कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 16 कोटींवर पोहोचली असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ऑस्ट्रेलियातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले दुसरे राज्य व्हिक्टोरियातील मेलबर्नमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

    मेलबर्न शहरात फक्त 26 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. शहराची लोकसंख्या 50 लाखांच्या आसपास आहे. इतक्या कमी प्रमाणात रुग्ण असतानाही लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

    कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. इतकंच नव्हे तर कोरोनाबाधितांमध्ये अधिक संसर्गजन्य असणाऱ्या बी1617 हा व्हेरिएंट आढळला आहे. त्याशिवाय व्हिक्टोरिया राज्यात कोरोना लसीकरणाचा वेगही कमी आहे. व्हिक्टोरिया राज्याचे कार्यवाहक स्टेट प्रीमियर जेम्स मर्लिनो यांनी आम्हाला व्हायरसचा अधिक वेगाने संसर्ग करणाऱ्या व्हेरिएंटचे आव्हान आहे.