पाकिस्तानात भीषण रेल्वे अपघात, ३० जणांचा मृत्यु, अशी घडली दुर्घटना

भिडंत मिल्लत एक्सप्रेस आणि सर सय्यद एक्सप्रेस या दोन रेल्वेंमध्ये हा अपघात झाला. अजूनही अनेक प्रवासी बोगींमध्ये अडकून पडल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे मृत्युमुखी पडललेल्यांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येतेय. पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांच्या सुमाराला हा अपघात झाला. 

    पाकिस्तानमध्ये एक भीषण रेल्वे अपघात घडलाय. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील डहारकी भागात सोमवारी झालेल्या या रेल्वे अपघातात एकूण ३० जणांचा बळी गेलाय. दो रेल्वे समोरासमोर आल्या आणि त्यांची टक्कर झाल्यामुळे हा अपघात घडला. या अपघातात ५० जण जखमी असून त्यातील काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळतेय.

    भिडंत मिल्लत एक्सप्रेस आणि सर सय्यद एक्सप्रेस या दोन रेल्वेंमध्ये हा अपघात झाला. अजूनही अनेक प्रवासी बोगींमध्ये अडकून पडल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे मृत्युमुखी पडललेल्यांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येतेय. पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांच्या सुमाराला हा अपघात झाला.

    मिळालेल्या माहितीनुसार भिडंत मिल्लत एक्सप्रेस ही कराचीवरून सरगोधा या ठिकाणी चालली होती. तर सर सय्यद एक्सप्रेस ही रावळपिंडीहून कराचीला चालली होती. दरम्यान, मिल्लत एक्सप्रेसवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने या एक्सप्रेसचे डबे शेजारच्या ट्रॅकवर गेले. त्याचवेळी दुसऱ्या दिशेने येणाऱ्या सय्यद एक्सप्रेसवर ते धडकल्यामुळे दोन्ही रेल्वेतील प्रवासी अपघातग्रस्त झाले.

    या दुर्घटनेनंतर सुमारे ४ तास बचाव कार्य सुरुच झालं नसल्याचं समजतंय. तब्बल ४ तासांच्या विलंबाने मदतकार्य सुरू झाल्यामुळे अनेकांना आपले  प्राण गमवावे लागल्याचा आरोप होतोय. अनेक बोगींपर्यंत अद्याप बचावकार्य पोहोचलं नसून नागरिक आतमध्ये अडकून पडल्याची भीती व्यक्त होतेय. या घटनेनंतर आजूबाजूच्या हॉस्पिटल्समध्ये इमर्जन्सी घोषित करण्यात आली असून सर्व डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना तातडीनं हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.