37 murders and a 340 word code message; After 51 years, the mystery of murder has been unraveled in America

वॉशिंग्टन : एक दोन नव्हे तर, ३७ हत्या करणाऱ्या खुन्याला तब्बल ५१ वर्षांनी अटक झाली आहे. या खुन्याने पोलिसांना ग्रह-ताऱ्यांच्या सांकेतिक भाषेचा वापर करत ३४० शब्दांचा कोड मेसेज पाठवला होता. या कोडचा उलगडा झाल्यानंतर हा खुनी पोलिसांच्या हाती लागला.

अमेरिकेचे पोलिस मागीवल अनेक वर्षांपासून या झोडियाक किलरचा अर्थात राशी मारेकऱ्याचा शोध घेत होते. के पजल असे या खुनीचे नाव आहे.

५१ वर्षांपूर्वी त्याने अमेरिकन पोलीस आणि मीडियाला कोड वर्डमध्ये एक मेसेज पाठवला होता. त्या संदेशात अनेक ग्रह ताऱ्यांचा समावेश होता. पोलिसांनी जगभरातील तज्ज्ञांच्या मदतीनं त्याचा उलगडा केला. पजलने १९६९ साली सॅन फ्रांसिस्को (San Francisco) शहरात ३७ हत्या केल्याची कबुली दिली होती. त्याच्या गुप्त मेसेजमध्ये तो या कोडचा वापर करत असे.

अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि बेल्जियमच्या तज्ज्ञ इंजिनिअरच्या टीमनं अखेर ५१ वर्षांनतर कोड मेसेजचा अर्थ शोधला.