मुलीच्या एका ऑनलाईन ऑर्डरवर तब्बल ४२ डिलिव्हरी बॉईज पोहोचले घरी, परिसरात उडाली एकच खळबळ

मनिला: फिलीपींसमधून (Philippines) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मुलीने ऑनलाईनवरून खाण्याची ऑर्डर (Online Food) दिली असता, तिच्या घरी १, २ नाही, तर तब्बल ४२ डिलिव्हरी बॉईज (Delivery Boys) त्या मुलीच्या घरी पोहोचले आहेत. परंतु एका ऑर्डरवर (Order) इतके जण एकसाथ आल्यामुळे येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. परंतु या गोष्टीचा खुलासा समोर आला आहे.

ऑर्डर दिल्यानंतर तब्बल ४२ फूड डिलिव्हरी वाले मुलीच्या घरासमोर जमा

मिळालेल्या माहितीनुसार, फिलीपींसमध्ये सेबू सीटी मध्ये एका शाळेच्या विद्यार्थ्यीनीने (One Students Of School) दुपारच्या वेळेस फूड अँपवरून काहीतरी खाण्याची ऑर्डर केली. त्यानंतर आपल्या मोठ्या बहिणीसोबत ऑर्डर येण्याची वाट पाहू लागली. परंतु या नंतर जे झालं ते खूप आश्चर्यजनक होतं.

कारण ऑर्डर दिल्यानंतर तब्बल ४२ फूड डिलिव्हरी वाले तिच्या घरासमोर जमा झाले. परिसरात लोकांना या गोष्टीची काहीच कल्पना नसल्यामुळे, ते सुद्धा चकीत झाले. त्यांनंतर येथील स्थानिक रहिवाश्यांनी हा प्रकार पाहिला. एका मुलाने या सर्व प्रकरणाचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला.

एक ऑर्डर ४२ डिलिव्हरी

कसा झाला सावळा गोंधळ ?

फूड अँपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा सर्व प्रकार घडला आहे. त्यामुळे मुलीने फूड अँप वरती एक ऑर्डर दिली असता, एकसाथ ४२ डिलिव्हरी बॉईज तिच्या घरी जेवणं म्हणजेच डिलिव्हरी घेऊन पोहोचले होते.