इस्त्रायलच्या बोनफायर फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरीत ४४ ठार

इस्त्रायलमध्ये मोठी दुर्घटना घडली असून बोनफायर फेस्टिव्हलमध्ये चेंगराचेंगरीत ४४ ठार झाल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोरोनाच्या आपत्तीवर मात केलेल्या इस्त्रायलमध्ये मोठ्या काळानंतर बोनफायर फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. यामध्ये झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत प्राथमिक माहितीनुसार १२ जणांचा मृत्यू तर १०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मोठी आपत्ती असल्याचे म्हटले असून लोकांच्या सलामतीसाठी प्रार्थना करतो असे म्हटले आहे.

    मोठ्या प्रमाणावर नुकसान
    मीडिया रिपोर्टनुसार माउंट मेरनमध्ये स्टेडिअमच्या खुर्च्या मोडल्या. यानंतर लोकांमध्ये चेंगराचेंगरी झाली. न्यूज चॅनल १२ नुसार यामध्ये ३८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आणखी काही लोक हॉस्पिटलमध्ये मृत झाल्याचे म्हटले आहे. झीव्ह हॉस्पिटलने आपल्याकडे सहा जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. यामुळे एकूण मृतांचा आकडा हा ४४ वर गेला आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा यहुदींसाठी जगातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आहे. हे एक वार्षिक तीर्थस्थळ आहे. हजारो लोक यहूदी वार्षिक स्मरणोत्सवासाठी दुसऱ्या शतकाचे संत संत रब्बी शिमोन बार योचाई यांच्या समाधीस्थळावर आले होते. रात्रभर प्रार्थना आणि डान्स केला जात होता. सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले घटनेचे व्हिडीओ भयानक आहेत. या व्हिडिओंमध्ये तिथे उपस्थित प्रत्येकजन वाचण्यासाठी एकमेकांवर चढण्याचा प्रयत्न करत होता. पोलीस आणि वैद्यकीय कर्मचारी जखमींपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

    इस्त्रायलच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख मेगन डेविड अॅडम यांनी सांगितले की, ४४ लोकांची प्रकृती नाजूक आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचविण्यासाठी हेलिकॉप्टर मागविण्यात आले आहेत. पोलिसांनुसार पायऱ्यांवरून काही जण घसरले यामुळे तिथे धावपळ उडाली. इस्त्रायलने कोरोना निर्बंध हटविल्यानंतर तिथे हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता. माउंट मैरनमध्ये गेल्यावर्षी बोनफायर कार्यक्रम रद्द केला होता.