Murder

पाकिस्तानातील अबुधाबी कॉलनीत राहणाऱ्या एका हिंदू कुटुंबाची काही अज्ञातांनी हत्या केली आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. येथील रामचंद मेघवाल (Ramchand Meghwal) नामक व्यक्तीच्या कुटुंबातील सर्वांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

    इस्लामाबाद : पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील ५ जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानात काही हिंसक जमावाने आणि स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांनी हिंदू मंदिरावर हल्ला (Attack on Hindu Temple) केला होता. या हल्ल्यात हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली होती. याप्रकरणी पाकिस्तानच्या न्यायालयाने संबंधित आरोपींना फटकार लगावून तोडलेलं मंदिर पुन्हा उभारण्याचे आदेश दिले होते. हे प्रकरण ताजं असताना, पाकिस्तानातील अल्पसंख्याकांच्या मनात दहशत निर्माण करणारं दुसरं प्रकरण समोर आलं आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातील अबुधाबी कॉलनीत राहणाऱ्या एका हिंदू कुटुंबाची काही अज्ञातांनी हत्या केली आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. येथील रामचंद मेघवाल (Ramchand Meghwal) नामक व्यक्तीच्या कुटुंबातील सर्वांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानातील हिंदू आणि शिख अल्पसंख्यांकामध्ये दहशतीचं वातावरण तयार झालं आहे.

    एका हिंदू परिवारातील सर्व सदस्यांची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू आणि कुऱ्हाड जप्त केली आहे. हल्लेखोरांनी याच हत्यारांनी संबंधित परिवाराचं हत्याकांड केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय मृत रामचंद्र मेघवाल शांततापूर्ण मार्गाने अबुधाबी कॉलनीत राहत होते. परिसरातच त्यांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. पण आजचा दिवस त्यांच्यासाठी काळा दिवस ठरला आहे. ही हत्या कोणी केली? किंवा या हत्येंमागचं नेमकं कारण काय आहे? याची अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.