अमेरिकेत जीवघेणी थंडी, ५८ जणांचा बळी, अनेक ठिकाणी वीज गायब, पाणीपुरवठा बंद

गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे आणि थंडीच्या कडाक्यामुळे अन्न मिळवण्यासाठी रांगेत नागरिक उभं राहिल्याचं चित्र दिसत होतं. ते चित्र यंदाही दिसू लागलंय. यंदा तर काही आठवडे अगोदरच थंडीने कहर करायला सुरुवात केलीय. बर्फाच्या वादळांमुळे अनेक ठिकाणी वीजेच्या तारा तुटल्या असून गेल्या पाच दिवसांपासून अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झालाय.

    कोरोनाच्या संकटातून सावरत असताना आता अमेरिकेसमोर कडाक्याची थंडी आणि बर्फाच्या वादळांचं मोठं संकट उभं ठाकलंय. अमेरिकेतील विविध राज्यांत सध्या बर्फाच्या वादळांनी थैमान घातलं असून आतापर्यंत ५८ जणांचा यात बळी गेलाय. अनेक अमेरिकी नागरिकांपर्यंत मदत पोहोचत नसून थंडीने त्यांचा बळी जात असल्याचं चित्र दिसतंय.

    गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे आणि थंडीच्या कडाक्यामुळे अन्न मिळवण्यासाठी रांगेत नागरिक उभं राहिल्याचं चित्र दिसत होतं. ते चित्र यंदाही दिसू लागलंय. यंदा तर काही आठवडे अगोदरच थंडीने कहर करायला सुरुवात केलीय. बर्फाच्या वादळांमुळे अनेक ठिकाणी वीजेच्या तारा तुटल्या असून गेल्या पाच दिवसांपासून अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झालाय.

    घरोघरी बसवण्यात आलेल्या हिटरमुळे नागरिकांचा कडाक्याच्या थंडीपासून बचाव होत असतो. मात्र विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे अनेक घरांतील हिटर बंद पडले आणि नागरिक कडाक्याच्या थंडीच्या कचाट्यात सापडले आहेत. अनेक नागरिकांनी स्वतःला घरात तर अनेकांनी स्वतःला त्यांच्या कारमध्ये कोंडून घेतलं. मात्र त्यामुळे कार्बन मोनॉक्साईडचं प्रमाण वाढून अनेक नागरिकांचा त्यात मृत्यू झाला. ओहियोसह इतर राज्यांत मिळून आतापर्यंत ५८ जणांचे आतापर्यंत प्राण गेले आहेत.

    तर टेक्सासमध्ये पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटल्यामुळे पाणीपुरवठा खंडित झालाय. त्यामुळे नागरिकांना सध्या बर्फ उकळून पाणी प्यावं लागत आहे. टेक्सासमध्ये साधारण ३ कोटी लोकसंख्या आहे. त्यापैकी निम्म्या लोकसंख्येला सध्या पाणीपुरवठा होत नसल्याचं चित्र आहे. हूस्टन स्टेडिअमबाहेर अनेक नागरिकांनी एक बाटली पाणी मिळवण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र दिसत होतं.