अफगाणिस्तानात युद्ध भडकण्याची शक्यता, पंजशीरमध्ये ६०० हून तालीबान्यांचा खात्मा; फोर्सचा दावा

पंजशीरमध्ये तालिबान आणि रेजिस्टेंस फोर्सच्यामध्ये युद्धा सुरू आहे. या युद्धातच फोेर्सकडून दावा करण्यात आला आहे की, त्यांनी ६०० तालिबान्यांचा खात्मा केला आहे. तसेच १००० तालिबान्यांनी तर शरणागती पत्करली आहे आणि त्यांना पकडण्यात आले आहे.

  अफगाणिस्तानातील आताची परिस्थिती पाहिली असता, अमेरिकी सेनेचे जनरल मार्क मिल्ले यांनी सांगितलं की, अफगाणिस्तानात पुन्हा एकदा युद्ध भडकण्याची शक्यता आहे आणि दहशतवादी संघटना हालाकिची परिस्थिती निर्माम करू शकतात. अल-कायदा पुन्हा एकदा संघटीत होऊ शकतो. ISIS आणि दुसऱ्या दहशतवादी संघटनेची गती वाढण्याची शक्यता आहे. तसेच

  ६०० तालिबानी मारले गेल्याची फोर्सचा दावा

  पंजशीरमध्ये तालिबान आणि रेजिस्टेंस फोर्सच्यामध्ये युद्धा सुरू आहे. या युद्धातच फोेर्सकडून दावा करण्यात आला आहे की, त्यांनी ६०० तालिबान्यांचा खात्मा केला आहे. तसेच १००० तालिबान्यांनी तर शरणागती पत्करली आहे आणि त्यांना पकडण्यात आले आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानाचं म्हणणं आहे की, पंजशीरची राजधानी बाजारक आणि प्रांतीय गव्हर्नरच्या परिसरात असणाऱ्या रस्त्यांवर लँडमाईन असल्यामुळे नागरिकांना पुढे जाण्यास अडचण निर्माण झाली आहे.

  तालिबानकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार, पंजशीरमध्ये स्वत:च अभियान जवळपास पूर्ण करण्यात आलं आहे. पंजशीरची राजधानी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर आहे. तालिबाकडून पंजशीरच्या काही प्रमुख कमांडर्सची देखील हत्या करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

  तालिबानला ISI कडून चालवलं जातयं…

  अफगाणिस्तानचे माजी उप-राष्ट्रपती आणि रेजिस्टेंस फोर्सचं नेतृत्व करणारे अमरूल्लाह सालेह यांनी पाकिस्तानच्या मुद्यावरून मोठा दावा केला आहे. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानला पाकिस्तानची कुख्यात गुप्तचर संस्था ISI चालवत आहे आणि तालिबानी प्रवक्त्यांना पाकिस्तानी दूतावासाकडून दर तासाला सूचना प्राप्त होतात