baby

भारतामध्ये २०२१ या नवीन वर्षाच्या(new year) पहिल्याच दिवशी जवळजवळ ६० हजार बालकांचा जन्म(60000 babies born in India) झाल्याची माहिती मिळाली आहे.  या घटनेमुळे वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक बालकांचा जन्म होण्याच्या यादीमध्ये भारत अव्वल राहील असा अंदाज व्यक्त होत आहे.

भारतामध्ये २०२१ या नवीन वर्षाच्या(new year) पहिल्याच दिवशी जवळजवळ ६० हजार बालकांचा जन्म(60000 babies born in India) झाल्याची माहिती मिळाली आहे.  या घटनेमुळे वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक बालकांचा जन्म होण्याच्या यादीमध्ये भारत अव्वल राहील असा अंदाज व्यक्त होत आहे.जगभरात ३ लाख ७० हजार बालकांचा १ जानेवारी २०२१ रोजी जन्म झाला आहे.

युनिसेफने भारतामध्ये पहिल्याच दिवशी ६० हजार बालकांचा जन्म होईल असं म्हटलं होतं. तसेच जगभरामध्ये ३ लाख ७० हजार बालकांचा १ जानेवारी २०२१ रोजी जन्म होईल असंही सांगितलं  होतं. मात्र यंदा भारतात वर्षाच्या पहिल्याच दिवशी जन्माला येणाऱ्या बालकांचे प्रमाण हे गेल्या वर्षीपेक्षा कमी आहे. गेल्या वर्षी म्हणजे १ जानेवारी २०२० रोजी भारतात ६७ हजाराहून अधिक बालकांचा जन्म झाला होता.

नवीन वर्षाच्या आगमनाआधीच १ जानेवारी रोजी सर्वाधिक बालकांचा जन्म कोणत्या देशांमध्ये होईल यासंदर्भातील अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार भारतात ५९ हजार ९९५ बालकांचा जन्म होण्याचा अंदाज होता. त्याचबरोबर चीन ३५ हजार ६१५, नायझेरिया २१ हजार ४३९, पाकिस्तान १४ हजार १६१, इंडोनेशिया १२ हजार ३३६, इथियोपिया १२ हजार ६, अमेरिका १० हजार ३१२, इजिप्त नऊ हजार ४५५, बांगलादेश नऊ हजार २३६ आणि डेमोक्रेटीक रिपब्लिक ऑफ काँगो आठ हजार ६४० बालकांचा जन्म होईल असं सांगण्यात आलं होतं. जगभरामध्ये १ जानेवारी जन्माला येणाऱ्या बालकांपैकी ५२ टक्के बालकं या दहा देशांमध्ये जन्माला येतील असं युनिसेफनं म्हटलं आहे.

यंदाच्या वर्षी जन्माला येणाऱ्या १४ कोटी बालकांचे सरासरी वयोमान हे ८४ वर्ष असेल असंही युनिसेफने म्हटलं आहे.