62 वर्षांची महिला तिसऱ्यांदा झाली प्रेग्नेंट, सोशल मीडियावर केला मोठा खुलासा…

काही जणांनी या महिलेला आई होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही जणांनी महिलेच्या वयाबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. परंतु या सर्व गोष्टींना दुर्लक्ष करत ही महिला आता तिसऱ्या मुलाची आई होणार आहे. त्यामुळे ती आनंद व्यक्त करताना दिसत आहे. 

  यूएस: 62 वर्षाची महिला तिसऱ्यांदा प्रेग्नेंट झाली असून तिने सोशल मीडियावर मोठा खुलासा केला आहे. ही 62 वर्षांची महिला 2 मुलांची आई आहे. परंतु आता या वयातही ती तिसऱ्यांदा प्रेग्नेंट झाली आहे. याबाबत महिलेने इन्स्टाग्रामवर आपल्या Pregnancyबाबत सांगितलं आहे. त्यानंतर यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही जणांनी या महिलेला आई होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तर काही जणांनी महिलेच्या वयाबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. परंतु या सर्व गोष्टींना दुर्लक्ष करत ही महिला आता तिसऱ्या मुलाची आई होणार आहे. त्यामुळे ती आनंद व्यक्त करताना दिसत आहे.

  16 वर्षांपूर्वी झालीये मीनोपॉज

  मिळालेल्या माहितीनुसार, तिची गर्भधारणा एका चमत्कारापेक्षा कमी नाही. कारण 16 वर्षांपूर्वी तिची मीनोपॉज  (Menopause) झाली आहे. इतकी वर्षे तिला मासिक पाळी आली नाही. एवढेच नाही तर तिच्या पतीची अनेक वर्षांपूर्वी नसबंदीही  (Vasectomy)  करण्यात आली आहे. या परिस्थितीत ती गर्भवती होण्याचा विचारही करू शकत नाही. जेव्हा त्याने ही बाब त्याच्या मित्रांना सांगितली. तेव्हा तेही आश्चर्यचकित झाले. नंतर त्याने ते सोशल मीडियावरही शेअर केले.

  पतीचे वय 72 वर्षे

  62 वर्षीय महिलेचं नाव जेनी असं आहे. आता ती 2 मोठ्या मुलांची आई आहे. तसेच तिला 72 वर्षांचा पतीदेखील आहे. जेनीने सांगितलं की, लोकांना आश्चर्य वाटते की मी गर्भवती आहे, पण जेव्हा त्यांना कळेल की माझे पती 72 वर्षांचे आहेत, तेव्हा त्यांना पूर्वीपेक्षा अधिक आश्चर्य वाटेल. थँक्सगिव्हिंगच्या शेवटी या वर्षी नोव्हेंबरमध्ये जेनीचे तिसरे अपत्य जन्माला येऊ शकते.

  काही लोकांनी सांगितले की, वयाच्या 35 व्या वर्षीही मूल होण्यास अयोग्य वाटते. परंतु अशा परिस्थितीत जेनीने वयाची पर्वा न करता 62 व्या वर्षी देखील मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला हे आश्चर्यजनक आहे. असं काही लोकांना  वाटतयं.