पाकिस्तानात अंत्ययात्रेत गोळीबार, ८ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी

दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून, १५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन गटांमध्ये जमिनीचा वाद होता, या वादातूनच झालेल्या भांडणात अंत्ययात्रेत गोळीबार झाल्याची माहिती स्थानिक बातम्यांमधून देण्यात येते आहे.

    इस्लामाबाद:  पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातून धक्कादायक बातमी समोर येते आहे. या ठिकाणी एका अत्यंयात्रेत गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. अत्यंयात्रा सुरु असतानाच, बंदुकीतून गोळ्या झाडण्यात आल्या.

    या दुर्घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला असून, १५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन गटांमध्ये जमिनीचा वाद होता, या वादातूनच झालेल्या भांडणात अंत्ययात्रेत गोळीबार झाल्याची माहिती स्थानिक बातम्यांमधून देण्यात येते आहे. यानंतर जखमींना तातडीने नजिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, यातील दहा जणांची प्रकृती अद्याप गंभीर आहे.