Haiti retroge

न्यूयॉर्कमध्ये (New York) राहणाऱ्या हैट्टी रेट्रोगे (Haiti Retroge) नावाच्या या आजाबाईंना एका तरुण बॉयफ्रेंडची (Boyfriend) प्रतीक्षा आहे. त्यासाठी त्यांचा जोरदार प्रयत्न सुरु आहे.

    न्यूयॉर्क : प्रेम कोणत्याही वयात होऊ शकतं आणि नातंदेखील कोणत्याही वयात जोडता येऊ शकतं,असं म्हणतात. अमेरिकेतील (America) एका ८५ वर्षांच्या तरुणीला हे अगदी तंतोतंत लागू होतं. एखाद्या तरुणालाही लाजवेल, असा या आजींचा उत्साह आहे. न्यूयॉर्कमध्ये (New York) राहणाऱ्या हैट्टी रेट्रोगे (Haiti Retroge) नावाच्या या आजाबाईंना एका तरुण बॉयफ्रेंडची (Boyfriend) प्रतीक्षा आहे. त्यासाठी त्यांचा जोरदार प्रयत्न सुरु आहे.

    या आजी ३९ वर्षांच्या एका तरुणाच्या प्रेमात पडल्या होत्या आणि दोघंही काही काळ रिलेशनशिपमध्ये होते. मात्र काही काळानंतर त्यांचं एकमेकांशी पटेनासं झालं आणि दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला. मात्र ब्रेकअपनंतर आजींना फारच सुनंसुनं आणि एकाकी वाटू लागलं आणि त्यांनी पुन्हा एकदा नव्या उत्साहानं नवा बॉयफ्रेंड शोधायला सुरुवात केली. बंबल नावाच्या एका डेटिंग साईटवर त्यांनी यासाठी मदत घेतली असून बॉयफ्रेंडचा शोध सुरू ठेवला आहे.

    हैट्टी यांचा १९८४ साली घटस्फोट झाला होता. पती पैसे कमावण्यासाठी पुरेशी मेहनत करत नसल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यांना दोन मुलं आणि तीन नातवंडं आहेत. पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर त्या सतत प्रेमाचा शोध घेत राहिल्या आणि आपल्यापेक्षा वयानं कमी असणाऱ्या तरुणांसोबत रिलेशनशीप बनवत राहिल्या.

    सध्या इस्त्रायलमधील एका व्यक्तीनं हैट्टी यांच्याशी ऑनलाईन संपर्क साधला असून आपला त्यांच्यावर ‘क्रश’ असल्याचं म्हटलंय. सध्या आपण कुणासोबतही डेट करत असून एकट्या आहोत, असं त्यांनी सांगितलं आहे. मात्र या एकटेपणाचा आपल्याला त्रास होत असून लवकरच आपल्याला एक अनुरुप बॉयफ्रेंड मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आपल्याला ३५ पेक्षा कमी वय असलेला बॉयफ्रेंड हवा आहे, अशी जाहीरातही त्यांनी वर्तमानपत्रात दिली आहे.