A 12-year-old boy flew 30 feet in the air with a kite and fell to the ground

जकार्ता  :  १२ वर्षाचा मुलगा पतंगासहित हवेत ३० फूट उंच उडून जमीनीवर कोसळला आहे.  इंडोनेशियाच्या (Indonesia) लम्पुग, प्रिंगसेवू रिजेन्सी (Pringsewu regency Lampung) येथील शाळेत पतंग उडविण्याच्या कार्यक्रमादरम्यान हा अपघात घडला.

जखमी मुलगा हा एक मोठा पतंग उडवित होता. यावेळी पतंगासह हवेत ३० फूट उडी मारून तो खाली कोसळला. या घटनेत हा मुलगा गंभीर जखमी झाला.

यापूर्वी देखील जकार्तामध्येही पतंगामुळे अनेक मुलांना दुखापत झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. डेली मेलने या संदर्भातील वृत्त दिले आहे.  या मुलाच्या हातात सहा ठिकाणी फ्रॅक्चर झाल्याची पुष्टीही डेली मेलने दिली आहे.  त्याला इतर अनेक जखमी झाल्या आहेत. घटनेच्या वेळी त्याचे भाऊ-बहीण पतंग उडवत होते.