अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींबाबत हशमत गनींकडून मोठा खुुलासा, नेमकं काय होतं कारण?

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, अशरफ गनी यांची हत्या करण्यासाठी एक कट रचण्यात आला होता. कारण काबुल शहरांमध्ये रक्तरंजित होईल आणि काही रिटायर्ड वारलॉर्ड याच संधीचा फायदा घेऊन आपला मार्ग मोकळा करतील. असा धक्कादायक कट रचण्यात आल्याचा दावा हशमत गनी यांनी केला आहे. 

    तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडला होता. परंतु त्यांचा भाऊ हशमत गनी काबुलमध्ये आहे. प्रभावशाली अफगानी नेता आणि उद्योजक हशमत यांनी माजी राष्ट्रपतींबाबत मोठा खुलासा केला आहे. तालिबानच्या हुकूमशाहीला त्यांनी स्वीकारलं असून तालिबानमध्ये त्यांच्या अद्यापही सहभाग नाहीये. अशरफ यांनी 15 ऑगस्टला अफगाणिस्तानमधून धूम ठोकली होती. तसेच ते आता यूएई मध्ये आहेत.

    एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, अशरफ गनी यांची हत्या करण्यासाठी एक कट रचण्यात आला होता. कारण काबुल शहरांमध्ये रक्तरंजित होईल आणि काही रिटायर्ड वारलॉर्ड याच संधीचा फायदा घेऊन आपला मार्ग मोकळा करतील. असा धक्कादायक कट रचण्यात आल्याचा दावा हशमत गनी यांनी केला आहे.

    तुम्ही तालिबानला पाठिंबा देत आहात, हे खरं आहे का?

    मी त्यांच्या हुकुमशाहीला स्वीकारलं आहे. परंतु माझा त्यांना पाठिंबा नाहीये. रक्तपात होऊ नये, यासाठी मी त्यांचं शासन स्वीकारलं आहे. मी माझ्या शिक्षित आणि सरकार सांभाळणाऱ्या नागरिकांसाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी थांबलो आहे. मी तालिबानला पाठिंबा देणार नाही. मी देशात राहणार कारण जेणेकरून मी तालिबान आणि ज्यांना देश कसा चालवायचा, व्यवसाय कसा चालवायचा हे माहीत आहे त्यांच्यात सेतू म्हणून काम करू शकेन. हे असे आहे जेणेकरून देश उध्वस्त होणार नाही, येथे उपासमार होणार नाही. हे माझे आत्ताचे विधान आहे.