A bottle of liquor costs one crore

व्हिस्कीच्या बाबतीत जेवढी जुनी दारू असेल तितकी तिची किंमत अधिक असे म्हटले जाते. युरोपमधील जॉर्जिया देशात एका व्हिस्कीच्या बाटलीला 1 लाख 37 हजार डॉलरची बोली लावण्यात आली आहे. भारतीय चलनात ही किंमत एक कोटीहून अधिक आहे. ही व्हिस्की दीडशे वर्ष जुने असून 19 व्या शतकात ही व्हिस्की बनविण्यात आली होती.

    दिल्ली : जगात अनेक ठिकाणी दारू शौकिनांसाठी वेगवेगळी दारू उपलब्ध आहे. त्यात महागड्या दारूंचाही समावेश आहे. आपण एखाद्या दारूची किंमत जास्तीत जास्त लाखोंच्या घरात ऐकली आहे. परंतु एक बाटली दारूची किंमत तब्बल एक कोटीच्या घरात लागली आहे. ग्राहकाने दारू पिऊनच एवढी महागडी दारू विकत घेतली की काय? असा प्रश्न काहींना पडला आहे. परंतु हे खरे आहे. एक बाटली व्हिस्कीची किंमत तब्बल एक कोटी रुपये इतकी लागली आहे.

    व्हिस्कीच्या बाबतीत जेवढी जुनी दारू असेल तितकी तिची किंमत अधिक असे म्हटले जाते. युरोपमधील जॉर्जिया देशात एका व्हिस्कीच्या बाटलीला 1 लाख 37 हजार डॉलरची बोली लावण्यात आली आहे. भारतीय चलनात ही किंमत एक कोटीहून अधिक आहे. ही व्हिस्की दीडशे वर्ष जुने असून 19 व्या शतकात ही व्हिस्की बनविण्यात आली होती.

    या व्हिस्कीचे नाव ओल्ड इंग्लेड्यु असून 1860च्या दशकात ही व्हिस्की बाटलीमध्ये बंद करण्यात आली होती. त्याकाळी युरोपचे नावाजलेले उद्योजक जे.पी.मॉर्गन यांच्या मालकीची ही बाटली आहे. या बाटलीवर बबॉर्न असे लिहिण्यात आले असून ही व्हिस्की 1865 पूर्वी बनवल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.